Janmarathi

ठाण्यात सोळा कोरोणा हॉटस्पॉट 9 मार्च ते 31 मार्च पर्यंत रहाणार लॉकडाऊन.

हॉटस्पॉट क्षेत्रांच्या बाहेर हालचालीस मुभा परंतू 16 क्षेत्रांमध्ये रहाणार 'प्रथम देशव्यापी लॉकडाऊनचे' नियम लागू. - महाराष्ट्र

ठाण्यात सोळा कोरोणा हॉटस्पॉट 9 मार्च ते 31 मार्च पर्यंत रहाणार लॉकडाऊन.
X
  • ठाण्यात पुन्हा कोरोना संसर्गात वाढ होऊ लागल्याने आज ९ मार्च पासून ते ३१ मार्च पर्यंत लॉकडाऊन करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त श्री. विपीन शर्मा यांनी दिले आहेत.
  • १६ हॉटस्पॉट क्षेत्रांमध्ये हा लॉकडाऊन लागू केला जात आहे.सर्कल १ मध्ये - कालवा वॉर्ड कमिटी एरिया, विटावा , ऐनगार, सूर्यनगर, खारेगाव एरिया, चेंदणी कोळीवारा, वागले आणि श्रीनगर एरिया. सर्कल २- लोढा अमारा, हिरानंदानी इस्टेट, हिरानंदानी मेडोस हाऊसिंग कॉम्प्लेक्स, लोकमान्य. सावरकारनगर वॉर्ड कमिटी एरिया - दोस्तनगर, शिवाई नगर, चौरस तोवर, कोलाबाद आणि रुस्तुमजी वृन्दावन. अशा तीन सर्कल मध्ये असलेल्या १६ वसाहती यात आहेत.
  • याबाहेरील प्रदेशांमध्य मिशन बिगिन अगेन या महाराष्ट्र सरकारच्या नियमानुसार शिथिलता राहील परंतु 16 प्रदेशांमध्ये पूर्वीच्या देशव्यापी लॉकडाऊनचे नियम लावले जातील.
  • विपीन शर्मा यांनी दिलेल्या आदेशामध्ये सांगितले आहे कि लॉकडाऊन लावण्याचा निर्णय हा मागील काही दिवसांत झालेल्या रुग्णवाढीमुळे घेण्यात आला आहे .

अनलॉक फेजेज च्या अंतर्गत नियमांमध्ये शिथिलता आल्यानंतर ठाणे येथे कोरोना रुग्ण संसर्गात अधिक वाढ झाल्याचे दिसून आले आहे. सोमवार सकाळी ठाणे येथे २,६९,८४५ कोरोना केसेस होत्या त्यामध्ये ६,३०२ मृतांची संख्या आहे.

Next Story