Janmarathi

नाशिक येथील रुग्ण संख्येत वाढ - करण्यात येणार अंशतः लॉकडाऊन नवे नियम जाहीर.

करण्यात येणार विकेंड लॉकडाऊन, जाणुन घ्या काय रहाणार चालू आणि काय रहाणार बंद. 10 महत्वपूर्ण मुद्दे.

नाशिक येथील रुग्ण संख्येत वाढ - करण्यात येणार अंशतः लॉकडाऊन नवे नियम जाहीर.
X

नाशिक येथे रुग्नांच्या संख्येत सततच्या वाढीमुळे जिल्हा प्रशासनाने निर्बंध कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी नवीन नियम पत्रक जारी केले आहे. सध्या जिल्ह्यामध्ये ४००० पेक्षा अधिक रुग्णांवर उपचार चालू असून या संख्येमध्ये सतत वाढ होताना दिसून येत आहे. त्यासाठी हे नवीन नियम आहेत असे त्यांनी यावेळी सांगितले.

या पत्रकातील १० मुद्दे ९ मार्च २०२१ रात्री १२ वाट पासून लागू करण्यात आले आहेत.

  1. विकेंड लॉकडाऊन - जिल्ह्यातील सर्व दुकाने सकाळी ७ ते संध्याकाळी ७ पर्यंतच चालू ठेवता येतील. त्यात केवळ अत्यावश्यक सुविधांच्या दुकानांना सूट देण्यात येणार. तसेच दार शनिवार व रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता पूर्णतः लॉकडाऊन असेल. सर्व आठवडेबाजार पुढुळ आदेशापर्यंत बंद राहतील.
  2. १५ मार्च पर्यंतचे नियोजित कार्यक्रम पोलिसांच्या परवानगीने घेण्यात यावेत. त्यासाठी लॉन्स, हॉल्स, मंगल कार्यालये, ई . च्या मालकांनी स्थानिक स्वराज्य संस्था आणि पोलिसांकडे प्रतिज्ञापत्रक सादर करण्याच्या अटीवर सकाळी ७ ते संध्याकाळी ७ च्या दरम्यान परवानगी देण्यात आली.
  3. खाद्यगृहे, हॉटेल्स ई. सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत नियमांचे पालन करत चालू ठेवण्यास परवानगी. परंतु ५०% आसनक्षमतेलाच परवानगी असेल. होम डिलिव्हरी देखील रात्री १० वाजेपर्यंतच चालू राहील.
  4. जिम , व्यायामशाळा, खेळाची मैदाने, स्विमिंग पूल ई. वैयक्तिक सरावासाठी चालू राहतील परंतु सार्वजनिक कार्यक्रम येथे घेण्यास मनाई राहील.
  5. सर्व प्रकारच्या सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली आहे.
  6. धार्मिक स्थळे सकाळी ७ ते संध्याकाळी ७ पर्यंतच चालू राहणार. कोणत्याही प्रकारच्या विषयीची केवळ ५ जणांना प्रवेश मिळणार. शनिवार व रविवारी सर्व धार्मिक स्थळे बंद राहणार.
  7. भाजीमंडई ५०% क्षमतेने चालू राहतील. एकदिवसाआड जागावातून हे करण्यात येईल.
  8. नाशिक व मालेगाव महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व शाळा, कॉलेज , कोचिंग क्लासेस पुढील आदेशापर्यंत बंद राहतील. १० वि, १२वी च्या विद्यार्थ्यांना पालकांच्या परवानगीने ऐच्छिक उपस्थिती असेल.
  9. नाशिक, नांदगाव , निफाड व मालेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात वाढत्या रुग्णसंख्यामुळे १० मार्च पासून शासकीय व खाजगी शैक्षणिक संस्था पुढील आदेशापर्यंत बंद राहातील.
  10. मास्क, सानिटायझर , सामाजिक आंतर नियमाचे पालन बंधनकारक.
Next Story