Janmarathi

सिनेसृष्ठी बाबत ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

Films are ready to release soon in cinema hall; सिनेमागृह आणि नाट्यगृहांना सुरु करण्यास मिळणार परवानगी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थानी वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय.

सिनेसृष्ठी बाबत ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
X
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 
राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे या तारखेपासून सुरू होणार!

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी महाराष्ट्रात सिनेमागृह आणि नाट्यगृह बंद करण्यात आली होती. परिणामी सिनेसृष्टी आणि त्याच्याशी निगडीत इतर उद्योग व्यवसाय ठप्प झाले होते मात्र नुकताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंबंधी एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. येत्या २२ ऑकटोबर २०२१ पासून सिनेमागृह आणि नाट्यगृहांना सुरु करण्यास परवानगी मिळाली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थानी वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
राज्यसरकारने यापूर्वी शाळा, धार्मिकस्थळे याप्रमाणे सावधगिरी बाळगत राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे याबाबत हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने मनोरंजन क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना संबंधित नियमांचे पालन करून चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे यांना अनुमती दिली आहे. यासंदर्भातील विस्तारित कार्य पद्धती म्हणजेच एसओपी तयार करण्याचे काम सुरू आहे. ती लवकरच नागरिकांसाठी जाहीर करण्यात येईल.

आज(२५ सप्टेबर) झालेल्या बैठकीत टास्क फोर्स सदस्य, खासदार संजय राऊत, मुख्य सचिव सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य डॉ प्रदीप व्यास तसेच निर्माता रोहित शेट्टी, कुणाल कपूर, मकरंद देशपांडे, सुबोध भावे, आदेश बांदेकर तसेच सिने नाट्य क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली
. कोरोनाची दुसऱ्या लाटेनंतर अनेक गोष्ठी पुन्हा नव्याने सुरु झाल्या असल्या तरी राज्य सरकारने नाट्यगृह आणि चित्रपटगृह याबाबत अतिशय सावधता बाळगली होती. परिणामी या क्षेत्रात असणाऱ्या कलाकारांचे आणि त्यावर अवलंबून असणाऱ्या कामगारांचे हाल सुरु झाले. यावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील अनेक कलाकरांनी आणि कर्मचाऱ्यांनी गेल्या काही दिवसात आंदोलन, निदर्शने सोशल साईट्स वरून प्रक्षोभक विधाने करण्यास सुरुवात केली
यापूर्वी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी १ सप्टेंबरपासून नाट्यगृह आणि चित्रपटगृह सुरु करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यावर काहीच कृती झालेली दिसली नाही. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात नटराजाची महाआरती देखील केली गेली होती. एक प्रकारे सरकारला जागे करण्याचा तो खटाटोप होता. मराठीतील अभिनेत्री प्रिया बेर्डे, अभिनेते गिरीश ओक, अभिनेत्री सुरेखा कुडची यांच्यासह अनेक कलाकारांनी यात सहभाग घेतला होता.
Next Story