Janmarathi

अदानीमुळे LIC ला मोठा झटका, मागील ५० दिवसांत ५० हजार कोटींचे नुकसान!

अदानीमुळे LIC ला मोठा झटका, मागील ५० दिवसांत ५० हजार कोटींचे नुकसान!
X

अदानीमुळे LIC ला मोठा झटका, मागील ५० दिवसांत ५० हजार कोटींचे नुकसान!

मागील एक महिन्यापुर्वी म्हणजेच २४ जानेवारी रोजी गौतम अदानी यांच्या आयुष्यात चक्रि वादळ आले. हे वादळ अजून ही शमलेले दिसत नाही. अदानी समूहातील या वादळचा फटका भारतातील सर्वात मोठया जीवन विमा कंपनी LIC ला बसला आहे. अदानी समूहात सर्वाधिक गुंतवणूक केल्यामुळे LIC चे चांगलेच आर्थिक नुकसान झाले आहे. अदानी यांच्या शेअरमध्ये रोज सुरु असलेल्या घसरणीमुळे LIC ची संपत्तीत घट झाली आहे. फक्त ५० दिवसांत ५० हजार कोटींचा फटका LIC ला बसला आहे. अमेरिकन संशोधन कंपनी हिंडनबर्गने अदानीबद्दल १०६ पानांचा अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यानंतर अदानी ग्रुपचे शेअर दिवसं-दिवस घसरु लागले आहेत.

Next Story
Share it