महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याला चहूबाजूंनी निसर्ग आणि इतिहासने भरभरून देणगी दिली आहे. महाराष्ट्रातील अशाच एक कोपऱ्यात दडलेला, त्याचा इतिहास फारसा माहीत नसलेला, परंतु निसर्गाने नटवलेला किल्ला म्हणजे कोकण दिवा.
Facebook
19/04/2023
पानशेत धरणाच्या शेवटी दापसरे आणि त्यापुढे घोळ नावाचे एक सुंदर गाव आहे. घोळ गावच्या दक्षिणेस चालत निघाले की गारजाई वाडीला पोहोचता येते.
Facebook
ही गारजाईवाडी डोंगरदऱ्यांनी वेढलेली आणि घनदाट जंगलात दडलेली आहे. इथून पुढे जंगलवाटेने पायपीट करून साधारण दीड-दोन तास चालत गेल्यावर गडावर पोहंचता येते.
Facebook
19/04/2023
Facebook
हा गड म्हणजे एक छोटी चौकी आहे. रायगडाभोवती अशा छोट्या किल्ल्यांची एक मालिकाच आहे. या किल्ल्यावर एक गुहा, दोन पाण्याची टाकी आणि छोटासा खडकाळ माथा आहे. माथ्यावरून रायगड आणि खोल तळ कोकण दिसते.
Facebook
Facebook
कोकणातून सांदोशी या गावातून एक वाट वर येते, त्याला कावल्याची वाट असे म्हणतात. जवळच एक खिंड असून त्याला कावल्या बावल्याची खिंड असे म्हणतात.
छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने जुल्फीकार खानला रायगडाला वेढा घालण्यास सांगितले. तो वेढा अधिक मजबूत करण्यासाठी औरंगजेबाने शहाबुद्दीन खानला मदतीला पाठवले.
Facebook
19/04/2023
Facebook
अशा घटनेचा साक्षीदार असलेला आणि दाट जंगलांनी वेढलेला हा कोकण दिवा खरंच पाहण्यासारखा आहे.
Facebook
19/04/2023
स्वारगेटहून घोळ या गावाला जाण्यासाठी बसची सुविधा आहे किंवा रायगड जिल्ह्यात रायगडपासून जवळच सांदोशी गाव आहे तिकडूनही किल्ल्यावर जाता येते.
Facebook