१०. शहामृग: जगातील सर्वात वेगाने धावणारे पक्षी मानले जातात. शहामृग ताशी ५० किमी वेगाने धावतो. त्याची लांबी ९.२ फूट आणि वजन १२० ते १३० किलो पर्यंत असते. त्यांचे आयुर्मान ३० ते ४५ वर्षे आहे आणि त्यांचे निवासस्थान 'सवाना आणि विषुववृत्तीय प्रदेश' आहे.
Facebook
९. ग्रिझली अस्वल: यांचे मूळ स्थान उत्तर अमेरिका आहे. या अस्वलाची लांबी ९.५ फूट आणि वजन ३५० किलो आहे. त्यांचे आयुष्य २५ वर्षे आहे आणि निवासस्थान उत्तर अमेरिका आहे.
23/03/2023
Facebook
८. मूस: हरणांची सर्वात मोठी प्रजाती आहे. त्यांची लांबी १०.२ फूट आणि वजन ८०० किलो आहे. आयुर्मान २० वर्षे आहे आणि निवासस्थान 'उत्तर युरोप आणि उत्तर अमेरिका' आहे.
23/03/2023
Facebook
७.बंगाल वाघ: हे वाघ संपूर्ण भारतात आढळतात. या वाघाची लांबी १०.५ फूट असून, वजन २५० किलो आहे. त्यांचे आयुष्य २५ वर्षे आहे आणि निवासस्थान 'दक्षिण आशिया' मध्ये आहे.
23/03/2023
Facebook
६.आशियाई हत्ती: आशियाई हत्ती हा दक्षिण आशिया खंडातील सर्वात मोठा भूमी प्राणी आहे. त्याची लांबी ११.३ फूट आहे आणि वजन ४००० किलो आहे. या हत्तीचे आयुर्मान ४८ वर्षे असून 'दक्षिण आशिया आणि आग्नेय आशिया'मध्ये त्यांचे वास्तव्य आढळते.
23/03/2023
Facebook
५. ध्रुवीय अस्वल: ध्रुवीय अस्वल ही अस्वलांची सर्वात मोठी प्रजाती आहे. या अस्वलाची लांबी ११.५ फूट लांब आणि वजन ८५० किलोपर्यंत आहे. त्यांचे आयुष्य २५ ते ३० वर्षे असते आणि त्यांचा 'आर्क्टिक सर्कल'मध्ये अधिवास अधिक आढळतो. ते नॉर्वे, ग्रीनलँड, कॅनडा आणि रशियाच्या उत्तरेस देखील आढळतात.
Facebook
23/03/2023
४. लायगर: हे वाघाच्या मूळ प्रजातींपेक्षा जाड आणि मोठे असतात. त्यांचे आयुष्य १३ ते १८ वर्षे असते आणि लांबी ११.८ फूट आहे. त्यांचे अंदाजे वजन ४५० किलो पर्यंत आहे.
Facebook
३.सायबेरियन वाघ: ही वाघांची एकमेव प्रजाती आहे जी बर्फ आणि थंडी सहन करू शकते. त्यांची लांबी १२ फूट आणि वजन ३३० किलो आहे. या प्रजातीचे आयुष्य १८ वर्षे आहे आणि निवासस्थान दक्षिण-पूर्व सायबेरिया आणि रशियामध्ये आढळतात.
23/03/2023
Facebook
२.आफ्रिकन बुश हत्ती: ग्रहावरील सर्वात मोठा सस्तन प्राणी आणि तीन हत्ती प्रजातींपैकी सर्वात मोठी हत्तीची जात आहे. १३ फूट लांब आणि ११ टन वजनापर्यंत वाढू शकते. या हत्तीचे आयुर्मान ७० वर्षे असून त्याचा अधिवास 'सब-सहारा आफ्रिका'मध्ये आढळतो.
23/03/2023
Facebook
Facebook
१.जिराफ: लांब मान आणि उंच पायामुळे हा संपूर्ण प्राणी साम्राज्यातील सर्वात मोठा प्राणी आहे. जिराफाचे पाय सुमारे ६ फूट लांब असतात. लांबी २० फूट, वजन ९०० किलो, आयुर्मान २५ वर्षे, उप-सहारा आफ्रिकेमध्ये आढळतात.