Janmarathi

अजित पवारांनी केलेल्या २०२१ च्या अर्थसंकल्पातील १० मोठ्या घोषणा

अजित पवारांनी अर्थसंकल्पातील केलेल्या १० मोठ्या घोषणा, २०२१ च्या अर्थसंकल्पातील मोठ्या घोषणा.महारा

अजित पवारांनी केलेल्या २०२१ च्या अर्थसंकल्पातील १० मोठ्या घोषणा
X

अजित पवार यांनी आज महाविकास आघाडीचा दुसरा अर्थसंकल्प विधानभवणात मांडला. यात काही मोठ्या घोषणा ह्या अजित पवार यांच्या द्वारे या अर्थसंकल्पात केल्या गेल्या. त्यापैकी १० महत्वाच्या घोषणा ह्या आपण पाहुयात.

अर्थसंकलपातील १० मोठ्या घोषणा पुढील प्रमाणे.

१) महिलांच्या नावावर घर घेतल्यास मुद्रांक शुल्कात सवलत मिळणार.

२) शाळकरी मुलींना एसटीचा मोफत प्रवास १५०० हायब्रीड बस उपलब्ध करून देणार.

३) ३ लाखापर्यंत पीक कर्ज वेळेत फेडल्यास शून्य टक्के व्याज लावणार.

४) पुण्यात रिंग रोडची घोषणा केली. त्यासाठी २४ हजार कोटींचा निधी देणार.

५) कोरोना संकटातील आरोग्य सेवेसाठी ७ हजार कोटींचा निधी उपलब्ध करणार.

६) पुणे नगर नाशिक दरम्यान २३५ किमीचा रेल्वे मार्ग उभारणार अशी घोषणा.

७) सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, रायगड, साताऱ्यात शासकीय मेडिकल कॉलेज उभारणार.

८) परिवहन विभागाला २५०० कोटी बस, स्थानकांसाठी १४०० कोटी रुपये देणार.

९) मुंबईतील कोस्टल रोड २०२४ आधी पूर्ण करण्यावर भर देणार.

१०) राज्यातल्या ८ प्राचीन मंदिराचा विकास करणार.

हे असे काही महत्वाचे १० मुद्दे हे २०२१ च्या अर्थसंकल्पात मांडले गेले.

Next Story