Janmarathi

भाजपाला दणका! पावसाळी अधिवेशनातून त्या १२ आमदारांचे निलंबन.

ओबीसी आरक्षणाचा ठराव मांडला जात असताना विरोधी पक्ष नेत्यांचा गदारोळ. घोषणा, गैरवर्तन तसेच धक्काबुक्कीमुळे सभेतून निलंबन.

भाजपाला दणका!  पावसाळी अधिवेशनातून त्या १२ आमदारांचे निलंबन.
X

भाजपाला दणका! पावसाळी अधिवेशनातून त्या १२ आमदारांचे निलंबन.


सभागृहाचे कामकाज चालू असताना ओबीसी आरक्षणाचा मुद्दा विरोधी पक्षाने नेत्यांनी ताणून धरला असता सभागृहात एकच गदारोळाला सुरुवात झाली. औपचारिक चर्चा चालू असून देखील होणारा गदारोळ काही थांबत नव्हात. उपाय योजना दाखल विधानसभेचे कामकाज काही काळापर्यंत स्थगित करण्यात आले. तरी देखील विरोधी पक्ष नेत्यांनी अध्यक्षांच्या दालनात गैरवर्तन करून तेथील तालिका अधिकार्यांशी गैरवर्तन करून त्यांनी शिवीगाळ तसेच धक्काबुक्की केली.

ओबीसी आरक्षणाचा ठराव राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांनी सभागृहात मांडला. संबंधित ठरवा विषयी सभागृहात बोलू दिले नाही म्हणून विरोधी पक्ष नेत्यांनी गोंधळ करण्यास सुरुवात केली. झालेल्या गदारोळावरून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अनिल परब यांची बैठक पार पडली आणि सर्व स्थिती विषयी चर्चा करून सोबतच सीसीटीव्हीवर ही तपासणी करण्यात आली. आणि हा निलंबनाचा ठराव सभागृहात मांडण्यात आला. या ठरावाला सर्व सहमतीने मान्य करण्यात आले. आणि भाजप विरोधी पक्षाचे एकुण १२ आमदारांचे सहमताने निलंबन करण्यात आले.

सभागृहाचे कामकाज चालू असताना ॲड. अशिष शेलार, डाॅ. संजय कुटे, अभिमन्यु पवार, गिरीश महाजन, अतुल भातखलकर, ॲड पराग गळवणी, हरीश पिंपळे, जयकुमार रावत, योगेश सागर, राम सातपुते, नारायण पुचे, किर्तीकुमार बागडीया यांनी सभागृहाच्या कामकाजात अडथळा निर्माण केला तसेच बेशिस्त वागणूकीचे प्रदर्शन घडवून निलंबनास कारणीभूत ठरले.

ठरावात मांडण्यात आलेले मुद्दे, सभागृहातील इतर अधिकार्‍यां विरोधात अर्वाच्च भाष्य केले, माइक उचलण्याचा प्रयत्न केला. वारंवार सूचना देऊनही गोदारोळ सुरुच होता. कामकाज तहकूब करण्यात आले असताना सुध्दा अध्यक्षाच्या दालनातील तालिका अधिकार्यांशी गैरवर्तन करून त्यांना धक्काबुक्की केली. तसेच सभामतीच्या दालना बाहेर घोषणाबाजी अशा प्रकारचे अशोभनिय आणि गैरवर्तन केल्याबद्दल या सर्वांचे सदस्यत्व एक वर्षाकरीता बाद करण्यात आले. तसेच निलंबनाचा काळावधीत त्यांना मुंबई आणि नागपुरच्या विधान भावनात येण्यास बंदी घालण्यात आली.

विरोधीपक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी या ठरावाला सहमती न दर्शवता, त्यांनी सभागृहातील कामकाजावर बहिष्कार घातला आणि ते पुढे असे म्हणाले. हा ठराव एकतर्फी मजुर करण्यात आलेला असून तो लोकशाहीचा खुन आहे. जाणिव पुर्वक विरोधी पक्षाचा सद्स्याची संख्या कमी व्हावी हा त्यांचा हेतू आहे. आम्ही सातत्याने सरकारावर हल्ले करतो त्यामुळे आमची संख्या कमी करण्याचा हेतू आहे. आम्ही अशा प्रकारच्या मुस्कादाबी सहन करणार नाही. आम्ही कामकाजावर बहिष्कार टाकतो. एकतर्फी कामकाज आहे आणि मोघलाईच कामकाज आहे. असे म्हणून त्यांनी सभागृहा बाहेर काढता पाय घेतला.

Next Story