Janmarathi

भाजपच्या महिला आमदारांच काळ्या साड्या घालून विधानसभेत आंदोलन

काळ्या साडी नेसलेल्या भाजप महिला आमदारांनी विधानसभेत आंदोलन केले. हे आंदोलन महिलांवरील अत्याचाराविरोधात केले गेले.

भाजपच्या महिला आमदारांच काळ्या साड्या घालून विधानसभेत आंदोलन
X

महाराष्ट्र राज्यात महिलांवरील अत्याचार वाढलेले असून त्यांना कोणत्याही प्रकारचा न्याय मिळत नाही. या साठी भाजपच्या महिला आमदारांनी जागतिक महिला दिना दिवशी काळ्या साड्या परिधान करून विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. यात त्यांनी राज्य सरकारविरोधात निषेध व्यक्त केला.

एक वर्ष उलटूनही महिला आयोगाला आजूनही अध्यक्ष नाही, पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण, गेल्या एका वर्षात महिलांवरील वाढलेले अत्याचार असे अनेक मुद्दे हे या महिला आमदारांचे होते. या भाजप महिला आमदारांचेचे म्हणणे आहे की जी मागच्या वर्षभरात महिलांवर अत्याचार झाले त्या विरोधात कोणतीही ठोस कारवाही झालेली नाही. अनेक मंत्र्यांवर आरोप होता आहेत. परंतु तरीही त्या मंत्र्यांवर कारवाही होत नाही. सरकार त्यांना पाठीशी घालायच काम करतेय असे आरोप त्यांनी राज्य सरकारवर केले आहेत.

आणि आज राज्याचे अर्थसंकल्प देखील सादर होणार आहे. अजित पवार अर्थसंकल्प सादर करतील. मात्र त्यापूर्वीच महिला ह्या आपल्याला आक्रमक झालेल्या दिसत आहेत. महिलांच्या सुर्षिततेसाठी या अर्थसंकल्पातून आपल्याला महिलांसाठी काही योजना येतात का हे पाहावे लागेल.

या जागतिक महिला दिनानिमित्त या महिला आमदारांचे एवढेच म्हणणे आहे की आज महिला दिन आहे आज तरी सरकारपर्यंत महिलांचा आवाज हा पोहचला पाहिजे. समाजातील महिलांवरील अत्याचार कमी झाले पाहिजेत. जे कोणी पूजा मृत्यू प्रकरणात दोषी असेल त्याच्या विरोधात कारवाई झाली पाहिजे. पुजाला न्याय मिळाला पाहिजे. तसेच इतर महिलांनाही सुरक्षितता मिळाली पाहिजे. व दोषींवर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे.

Next Story