Janmarathi

"सचिन वझेंना आधी निलंबित करा"- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस. हिरेन प्रकरण.

हिरेन प्रकरणावरून विधानसभेत झाला गदारोळ. सचिन वझें विरोधात विधानसभा विरोधी पक्षनेते फडणवीसांचा आक्रमक पवित्रा.

सचिन वझेंना आधी निलंबित करा- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस. हिरेन प्रकरण.
X

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावरून ठाकरे सरकारवर तीव्र टीका केली. अंबानी स्फोटप्रकरणात सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह २५ फेब्रुवारी रोजी संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. याबाबतीत अजून कोणतीही ठोस कारवाही करण्यात आली नाही असे म्हणत असताना फडणवीसांनी हिरेन यांची पत्नी विमला हिरेन यांनी दिलेला जबाब वाचून दाखवला. जबाबाचा दाखल देत एंकाउंटर स्पेशालिस्ट सचिन वझे यांनीच हिरेन यांचा खून केला असल्याचे तवे म्हणाले. त्यामुळे त्यांना तात्काळ निलंबित करावे अशी मागणीही त्यांनी केली.

यावर गृहमंत्री श्री. अनिल देशमुख यांनी उत्तर देत असताना म्हटले कि, हिरेन यांची घटना दुर्दैवी आहे. हि हत्या होती कि आत्महत्या यावर अजून तपास होत आहे. स्फोटक प्रकरणाचा तपास एन.आय. एस. तसेच हिरेन यांच्या पत्नीने दाखल केलेल्या तक्रारी बाबतचा तपस ए.टी. एस. करत आहे." विरोधी पक्षाकडे अधिक पुरावे असतील तर त्यांनी ते ए.टी. एस. कडे द्यावे ते निष्पक्ष तपास करतील अशी गवाही मी देतो." असेही ते म्हणाले

यावरून परत फडणवीसांनी गृहमंत्र्यांवर टीका केली कि, मिळालेले पुरावे वझे याना अटक करण्यासाठी पुरेसे आहेत परंतु वझे पक्षाशी निगडित असल्याने त्यांना पाठीशी घालण्यात येत आहे. त्यांनी पुन्हा वझेन बडतर्फ व अटक कर्णयची मागणी केली असता भाजप नेत्यांनी घोषणाबाजी केली. त्यानंतर विधानसभा तणावात वाढ होऊन गदारोळ झाला.

Next Story