२०२१ च्या अर्थसंकल्पात कोणाला काय मिळाले?
२०२१ च्या अर्थसंकल्पात कोणाला काय मिळाले हे पाहणार आहोत, २०२१ च्या अर्थसंकल्पातील महत्वाचे मुद्दे पाहणार आहोत.

अजित पवार यांनी आज महाविकास आघाडीचा दुसरा अर्थसंकल्प विधानभवणात मांडला. यात काही मोठ्या घोषणा ह्या अजित पवार यांच्या द्वारे य अर्थसंकल्पात केल्या गेल्या. तर त्या घोषणा कोणत्या केल्या गेल्या हे आपण पाहुयात.
या बजेट मधील कृषी क्षेत्रातील महत्वाचे मुद्दे :
१) ३ लाखापर्यंत मर्यादित कर्ज घेणाऱ्यांना शून्य टक्के व्याजाने कर्ज.
२) एपीएमसीच्या बळकटीकरणासाठी २ हजार कोटी रुपयांची योजना.
३) कृषिपंपाच्या सौर ऊर्जा जोडणीसाठी महावितरणला १ हजार ५०० कोटी.
४) विकेल ते पिकेल धोरणासाठी २ हजार १०० कोटींची योजना.
५) संत्री प्रकलापची घोषणा.
६) राज्यभरात अहिल्याबाई होळकरांच्या नावाने तालुका स्तरावर रोपवाटिका केंद्र.
७) ४ कृषी विद्यापीठांनां दरवर्षी २०० कोटी रुपये देणार.
८) पक्का गोठा बांधन्यासाठी अर्थसहा्य उपलब्ध करून देणार.
९) पशुसंवर्धन मस्य विभागाला ३ हजार ७०० कोटी देणार.
पायाभूत सुविधा संदर्भात महत्वाचे मुद्दे :
१) मुंबई गोवा सागरी महामार्गासाठी ९ हजार ७७३ कोटी रुपये.
२) राज्यातल्या इमारतीसाठी ९४६ कोटींचा निधी जाहीर.
३) नागपूर वर्धा भंडारा नारखेडचा मेट्रो प्रकलपात अंतर्भाव करणार.
आरोग्यसाठी चे महत्वाचे मुदे :
१) कोरोनाच्या संकटात आरोग्य विभागासाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद.
२) आरोग्य सेवांसाठी ७ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद.
३) सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, रायगड, साताऱ्यात शासकीय मेडिकल कॉलेज
४) रुग्णालयात आग प्रतिबंधक उपकरणं लावण्यात येईल.
५) ११ शासकीय परीचारिका विद्यालयांचे महाविद्यालयात रूपांतर.
६) प्रत्येक जिल्ह्यात कोरोना उपचार केंद्र उभारणार.
महिलांसाठी केलेल्या घोषणा :
१)महिलांच्या नावावर घर घेतल्यास मुद्रांक शुल्कात सवलत.
२) राजमाता गृहस्वामिनी या योजनेची १ एप्रिल पासून अंमलबजावणी.
३) शाळकरी मुलींना एसटीचा मोफत प्रवास १५०० हायब्रीड बस उपलब्ध करून देणार.
४) क्रांतिज्योती सावित्रबाई फुले यांच्या नावाने शाळकरी मुलींसाठी बस योजना?
५) मोठ्या शहरात तेजस्विनी योजनेत अधिक बस उपलब्ध करून देणार.
६) महाराष्ट्रात पहिल्या स्वतंत्र महिला राज्य राखीव दलाची घोषणा.
इत्तर महत्वाचे मुद्दे :
१) पुण्यात साखर संग्रहालय उभारण्याचा निर्णय.
२) मुंबईत २०० कोटी खर्चून राज्य नियोजन भवन उभारणार.
असे काही महत्त्वपूर्ण मुद्दे हे अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय बजेट २०२१ मध्ये मांडले.