Janmarathi

Amarnath Yatra Date: अमरनाथ यात्राचे वेळापत्रक जाहीर, नोंदणी आणि प्रवासाची तारीख जाणून घ्या.......!

Amarnath Yatra Date: अमरनाथ यात्राचे वेळापत्रक जाहीर, नोंदणी आणि प्रवासाची तारीख जाणून घ्या.......!
X

Amarnath Yatra Date: अमरनाथ यात्राचे वेळापत्रक जाहीर, नोंदणी आणि प्रवासाची तारीख जाणून घ्या.......!

दक्षिण काश्मीरमधील अमरनाथ मंदिरात भोले बाबाचे दर्शन घेण्याची तारीख जाहीर झाल्याने या बर्फानी बाबाच्या दर्शनासाठी इच्छुक असलेल्या भाविकांची प्रतीक्षा संपली आहे. ही वार्षिक यात्रा १ जुलैपासून सुरू होऊन ३१ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. अधिकाऱ्यांनी शुक्रवारी याबाबत माहिती दिली.

अमरनाथ यात्रेसाठी १७ एप्रिलपासून नोंदणी.......

दक्षिण काश्मीरमधील हिमालयीन प्रदेशात ३,८८० मीटर उंचीवर असलेल्या पवित्र गुहेतील शिवलिंगाच्या दर्शनासाठी दरवर्षी या यात्रेचे आयोजन केले जाते. १७ एप्रिलपासून यात्रेसाठी नोंदणी सुरू होणार आहे. राजभवन येथे जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या श्री अमरनाथजी श्राइन बोर्डाच्या (SASB) ४४व्या बैठकीत यात्रेचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले. यात्रेचे वेळापत्रक जाहीर करताना लेफ्टनंट गव्हर्नर सिन्हा म्हणाले की, जम्मू काश्मीर प्रशासन अखंडित यात्रेसाठी वचनबद्ध आहे. मनोज सिन्हा म्हणाले की, सर्व भाविक आणि सेवा प्रदात्यांना प्रशासन सर्वोत्तम आरोग्य सेवा आणि इतर आवश्यक सुविधा पुरविणार आहे.

अमरनाथ मंदिर हे भारतातील जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात स्थित एक हिंदू मंदिर आहे. ३,८८८ मीटर उंचीवर वसलेली एक गुहा आहे. अनंतनाग शहरापासून सुमारे १६८ किमी अंतरावर, जिल्हा मुख्यालय, जम्मू आणि काश्मीरची उन्हाळी राजधानी श्रीनगरपासून १४१ किमी अंतरावर आहे. सिंध व्हॅलीमध्ये असलेली ही गुहा हिमनद्या, बर्फाच्छादित पर्वतांनी वेढलेली आहे आणि ती उन्हाळ्यातील काही काळ वगळता बहुतेक वर्षभर बर्फाने झाकलेली असते. १९८९ मध्ये या ठिकाणी येणाऱ्या यात्रेकरूंची संख्या १२,००० ते ३०,००० दरम्यान होती. २०११ मध्ये, ६.३ लाख यात्रेकरूंच्या संख्येने उच्चांक गाठला आहे.

Next Story