Janmarathi

जाणुन घ्या महाशिवरात्री बाबतचे संदर्भ व कशी करण्यात येते देशभरात साजरी.

महाराष्ट्रात माघ महिन्यात साजरी करण्यात येते महाशिवरात्र. शिव पुराण, पद्म पुराण, आणि अग्नि पुराणात सांगितले आहे महत्त्व.

जाणुन घ्या महाशिवरात्री बाबतचे संदर्भ व कशी करण्यात येते  देशभरात साजरी.
X

आज मराठी माघ या मराठी महिन्याच्या कृष्ण चतुर्दशीला 'महाशिवरात्री' साजरी केली जाते. दर महिवण्याच्या त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री म्हणले जात असले तरी माघ माहियातील या दिवसाला हिंदू धर्मियांकडून अधिक महत्व दिले जाते. यादिवशी महादेवाची पूजा आराधना केली जाते, भाविक उपवास करतात. महाशिवरात्र हि देशभरात साजरी केली जाते उत्तरभारतात हा दिवस फाल्गुन महिन्याचा भाग समजला जातो. इंग्रजी महिन्यानुसार साधारणतः महाशिवरात्री फेब्रुवारी - मार्च या महिन्यामध्ये येते.

यादिवशी महादेवाचे पंचगव्यानी अभिषेक केले जातात तर पंचामृताचा शिवलिंगाला लेप देण्याची पद्धतही आहे. पांढरी फुले, बेल, धोतऱ्याचे फुल इ. वाहिली जातात. काश्मीरमध्ये याकाळात होणारे हिमवर्षा पवित्र मानली जाते. शंकराचार्य टेकडीवर दर्शनासाठी भाविक जातात, अक्रोड कमळाची पुळे वाहण्याची प्रथा आहे. तर दक्षिण भारतामध्ये आदल्या दिवशी एक वेळा जेवण घेऊन दुसऱ्या दिवशी शिवाचे दर्शन घेऊन त्याला निळे कमळाचे फुल,तुळशीची पाने, तांदळाचे पायसम नैवेद्य दिले जाते यावेळी ऋग्वेद, सामवेद इ. मधील सूक्तांचे पठण केले जाते.

महाशिवरात्रीच्या दिवशी बावरा ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणांना यात्रा भरतात. महाराष्ट्रामध्ये वेरूळचे गरुडेश्वर मंदिर, औढा नागनाथाचे मंदिर, कणेरी यात्रा, औरंगाबाद येथील खडकेश्वर इ. ठिकाणी यात्रा होते.

महाशिवरात्री बाबत अग्नी पुराण, शिव पुराण, पद्म पुराणात माहिती देण्यात आली आहे.

Next Story