Janmarathi

'महामृत्युंजय मंत्र', अर्थ, आराधना व त्याच्याशी जोडलेल्या पौराणिक कथा.

भारतातील सर्वात जुन्या मंत्रांपैकी एक असलेला 'महामृत्युंजय मंत्र', त्याचा पुराण - संदर्भासहित अर्थ व त्याच्या उद्भवाशी निगडीत कथा.

महामृत्युंजय मंत्र, अर्थ, आराधना  व त्याच्याशी जोडलेल्या पौराणिक कथा.
X

ओम त्र्यंबकं याजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम |

उर्वारुक्मीव बंधनांन मृत्त्योर्मुक्षीय ममृतात ||

हा मृत्युंजय मंत्र असून हा भारतीय पुराणातील एक सर्वात जुना मंत्र समजला जातो. यालाच 'महामृत्युंजय मंत्र' म्हणूनहि ओळखले जाते. याची तीन शब्दात विभागणी केली असता 'महा' , 'मृत्यू' , 'जया' असे तीन शब्द मिळतात त्यातून अर्थबोध होणे सोपे होते.

ऋग्वेद व यजुर्ववेदामध्ये मृत्युंजय मंत्राचा उल्लेख आपणास दिसून येतो. हा मंत्र भगवान शिवाच्या आराधनेच्या वेळी म्हटला जातो. या मंत्राला 'रुद्र मंत्र' , 'त्र्यंबकं मंत्र' असे म्हणून देखील ओळखले जाते. या मंत्रामध्ये महादेवाच्या त्र्यंबक म्हणजेच तीन नेत्र असलेल्या रूपाची पूजा करत असल्याचे म्हटले आहे. मृत्युंजय मंत्राच्या उद्भव बाबत विविध कथा भारतीय पुराणांमध्ये दिसून येतात.

या मंत्राचा अर्थ असा होतो कि - ' आम्ही तीन नेत्र असलेल्याची पूजा करत आहोत, सुगंधी सुवास असलेला जो आमचे पालन - पोषण करतो, त्याच्याकडे आमची प्रार्थना आहे कि, आम्हाला जन्म - मृत्यूच्या या चक्रातून आम्हाला मुक्त कर.'

पुराणानुसार या मंत्राचा वापर विविध ऋषींनी तसेच 'सतीने' चंद्रावर, दक्षाच्या शापाने आलेल्या संकटापासून मुक्तता मिळवण्यासाठी केला होता, त्यामुळे महादेवाने चंद्राला वाचवण्यासाठी स्वतःच्या डोक्यावर विराजित केले. अशी व अशा अनेक कथा आपणास पुराणामध्ये मिळतात.

Next Story