Janmarathi

IPL 2023: एवढे कट्टर फॅन होणे नाही........ पाहा दोन क्रिकेट चाहत्यामधील करार !

IPL 2023: एवढे कट्टर फॅन होणे नाही........ पाहा दोन क्रिकेट चाहत्यामधील करार !
X

IPL 2023: एवढे कट्टर फॅन होणे नाही........ पाहा दोन क्रिकेट चाहत्यामधील करार !

भारतात क्रिकेट आणि क्रिकेट खेळाडूंचे किती चाहते आहेत ते आपल्याला माहित आहे. सध्या आयपीएल २०२३ चा हंगाम ३१ मार्च पासून सुरु होत आहे. अशातच सोशल मीडियावर दोन तरुणांनी आपली आवडती टीम २०२३ ची विजेता ठरेल या बदल केलेला करार व्हयरल होत आहे. या करारात अपूर्व माळवदकर आणि सौरभ अग्रवाल या दोन तरुणाच्या नावाचा उल्लेख आहे. अपूर्व माळवदकर हा मुंबई इंडियन्सचा कट्टर चाहता आहे. जर मुंबई इंडियन्स फायनल जिंकली तर अपूर्व हा सौरभला पार्टी देणार आणि लगेच खाली अपूर्व ने सही आणि अंगठा लावला आहे. सौरभ हा चेन्नई सुपरकिंग्सचा कट्टर चाहता आहे. सौरभने पण अपूर्वला करार करून दिला आहे. जर चेन्नई फायनल जिंकली तर सौरभ हा अपूर्वला आणि त्याच्या मित्रांना पार्टी देनार आहे. दोघांनी पण या करारवर सह्या आणि अंगठे लावले आहेत.

हा करार पाहून सोशल मीडियावर चर्चेला तुफान उधाण आले आहे. या व्हायरल झालेल्या फोटोवर नेटकऱ्यानी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका युजर ने लिहले आहे कि, 'आयपीएल चा परिणाम दिसू लागला आहे'.

Next Story