Janmarathi

Kuldeep Yadav: इतका चांगला खेळून ही कुलदीप यादव संघाबाहेर का राहतो? पाहा कुलदीप यादवच्या काही खास फोटो......

Kuldeep Yadav:  इतका चांगला खेळून ही कुलदीप यादव संघाबाहेर का राहतो? पाहा कुलदीप यादवच्या काही खास फोटो......
X

Kuldeep Yadav: इतका चांगला खेळून ही कुलदीप यादव संघाबाहेर का राहतो? पाहा कुलदीप यादवच्या काही खास फोटो......

भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय चायनामन गोलंदाजांपैकी एक, कुलदीप यादवने क्रिकेट विश्वात खूप मोठे नाव कमावले आहे, त्यामुळे त्याचा परिचय करून देण्याची गरज नाही. युझवेंद्र चहल आणि त्याने मिळून मधल्या फळीवर बराच काळ राज्य केले आहे. मधल्या फळीत दोघेही फलंदाजांना बांधून ठेवतात. दोघांची अप्रतिम कामगिरी आहे. कुलदीप यादव हा एक भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे. तो गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू आहे जो डावखुरा अनऑर्थोडॉक्स फिरकी गोलंदाज आहे आणि एक सक्षम लोअर ऑर्डर फलंदाज आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये भारत आणि उत्तर प्रदेशसाठी खेळतो. कुलदीप, भारतीय अंडर-१९ क्रिकेट संघाकडून खेळला आहे आणि २०१४ मध्ये अंडर-१९ क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये खेळला आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ नंतर कुलदीप यादव आणि चहल यांना वारंवार संधी मिळत होत्या आणि या दोघांनीही संधी वाया जाऊ दिल्या नाहीत. २०१९ च्या विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध बाबर आझमला बाद करण्याचा तो चेंडू कोणताही चाहता विसरू शकत नाही.

कुलदीप यादवच्या कारकिर्दीबद्दल सांगायचे झाले तर, त्याचा जन्म १४ डिसेंबर १९९४ रोजी उत्तर प्रदेशातील कानपूर येथे झाला. कुलदीपचे वडील वीटभट्टीचे मालक होते. त्याने मुलाखतीत सांगितले की, त्याच्या वडिलांनीच कुलदीपला क्रिकेट खेळण्यासाठी प्रेरित केले आणि त्यांनीच कुलदीपला यादवला क्रिकेट अकॅडमि मध्ये पाठवलं.

तुमच्या माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगतो की, कुलदीप यादव वसीम अक्रम आणि झहीर खान यांच्यापासून प्रेरित होता, या कारणास्तव त्याला वेगवान गोलंदाज बनायचे होते परंतु त्याने स्पिनर बनण्याचा निर्णय घेतला.

त्याने एका संभाषणात सांगितले होते की, तो जीवनातील एका वाईट टप्प्यातूनही आला होता, जिथे त्याने उत्तर प्रदेशच्या १५ वर्षांखालील गटात स्थान न मिळाल्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता.

त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने धर्मशाला येथे फेब्रुवारी २०१७ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण केले. १८ डिसेंबर २०१९ रोजी, वेस्ट इंडिजविरुद्ध, तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन हॅट्ट्रिक घेणारा भारताचा पहिला गोलंदाज ठरला. १७ जानेवारी २०२० रोजी, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात, यादव त्याच्या ५८ व्या डावात, ODI क्रिकेटमध्ये १०० बळी घेणारा, डावाच्या बाबतीत, भारतासाठी सर्वात वेगवान फिरकी गोलंदाज बनला.

यादव, २०१२ मध्ये मुंबई इंडियन्स संघाचा सदस्य होता आणि २०१४ मध्ये कोलकाता नाइट रायडर्सने त्याला साइन अप केले होते. जानेवारी २०१८ मध्ये, २०१८ IPL लिलावात यादवला KKR ने परत विकत घेतले. फेब्रुवारी २०२२ मध्ये, २०२२ इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या लिलावात त्याला दिल्ली कॅपिटल्सने विकत घेतले.

Next Story