Janmarathi

Sir Award: 'सर' या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आलेले ९ क्रिकेट खेळाडू......पाहा यादी !

Sir Award: सर या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आलेले ९ क्रिकेट खेळाडू......पाहा यादी !
X

Sir Award: 'सर' या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आलेले ९ क्रिकेट खेळाडू......पाहा यादी !

क्रिकेट हा जगातील सर्वाधिक लोकप्रिय खेळांपैकी एक आहे. ब्रिटीश राजा किंवा राणी उत्कृष्ट खेळाडू किवां देशसेवेसाठी 'नाईटहूड' पुरास्कार प्रदान करतात. हा सन्मान ज्यांना दिला जातो, त्यांच्या नावापुढे सर असे लिहिले जाते. भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाच्या नावापुढे ‘सर’ लावले जाते, पण जडेजाला खरंच 'नाईटहूड' प्रदान करण्यात आला आहे का? तर याचे उत्तर आहे नाही. झाले असे कि, एकदा महेंद्रसिंग धोनीने त्याला गंमतीने सर म्हटले आणि तेव्हापासून सगळे जडेजाला ‘सर’ म्हणू लागले.

या ९ क्रिकेटपटूंना 'सर' ही पदवी देण्यात आली आहे.......

१) सर लिओनार्ड हटन:

लिओनार्ड हटनचे नाव ‘सर’ ही पदवी मिळविणाऱ्या खेळाडूंमध्ये प्रथम येते. इंग्लंडचा हा स्टार विजेतेपद पटकावणारा पहिला खेळाडू ठरला. १९२६ मध्ये ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर त्याने न्यूझीलंडविरुद्ध पदार्पण केले आणि १९५५ मध्ये त्याने शेवटचा कसोटी सामना खेळला.

२) सर जॅक हॉब्स:

इंग्लंडचा महान क्रिकेटपटू जॅक हॉब्स हा ‘सर’ ही पदवी मिळविणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. जॅक हॉब्स यांना त्यांच्या अप्रतिम विक्रमासाठी १९५५ मध्ये 'सर' ही पदवी मिळाली. सर जॅक हॉब्स हे क्रिकेटच्या इतिहासातील महान फलंदाजांपैकी एक मानले जातात.

३) सर डोनाल्ड ब्रॅडमन:

ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज सर डोनाल्ड ब्रॅडमन यांनाही सर ही पदवी मिळाली. जेव्हा-जेव्हा कसोटी आकडेवारीचा उल्लेख केला जातो, तेव्हा ब्रॅडमनचे नाव आदराने घेतले जाते. ब्रॅडमन यांनी १९४८ मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि क्रिकेटच्या सर्व डावांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना 'सर' ही पदवी देण्यात आली. क्रिकेटच्या इतिहासातील महान फलंदाज म्हणून त्याची सर्वत्र ओळख आहे.

४) सर गॅरी सोबर्स:

वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार आणि सर गॅरी सोबर्स हे सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक आहेत. त्याने गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही विभागात समान पराक्रम दाखवला आणि क्रिकेटमधील सर्वात स्टायलिश अष्टपैलू खेळाडूंपैकी एक म्हणून ओळखले जात असे. १९७५ मध्ये राणी एलिझाबेथने त्यांना 'सर' ही पदवी दिली.

५) सर व्हिव्हियन रिचर्ड्स:

या यादीत वेस्ट इंडिजचा फलंदाज विवियन रिचर्ड्सचाही समावेश आहे. १९९९ मध्ये, क्रिकेटमधील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना अँटिग्वा सरकारने 'सर' ही पदवी प्रदान केली. त्याने वेस्ट इंडिजला दोनदा (१९७५ आणि १९७९) विश्वचषक जिंकून दिला आहे.

६) सर इयन बोथम:

इंग्लंडचा माजी कर्णधार आणि जगातील महान अष्टपैलू खेळाडूंपैकी एक, इयान बॉथम हा ‘सर’ ही पदवी मिळवणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. २००७ मध्ये क्वीन एलिझाबेथने त्याला नाइट पुरस्कार दिला आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीमध्ये त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याने क्रिकेटच्य इतिहासात खऱ्या अष्टपैलू खेळाडूचा दर्जा मिळवला आहे.

७) सर कोर्टली अॅम्ब्रोस:

वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज आणि जागतिक दर्जाचा वेगवान गोलंदाज कर्टली अॅम्ब्रोसचाही सर ही पदवी मिळालेल्या खेळाडूंच्या यादीत समाविष्ट आहे. २००४ मध्ये, क्रिकेटमधील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना अँटिग्वा सरकारने 'सर' ही पदवी प्रदान केली.

८) सर रिचर्ड हॅडली:

ऐंशीच्या दशकातील अष्टपैलू खेळाडू रिचर्ड हॅडली हा महान खेळाडूंपैकी एक मानला जातो. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ४०० बळी घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला. क्रिकेटमधील योगदानाबद्दल त्यांना १९९० मध्ये नाइट (सर) ही पदवी देण्यात आली आहे.

९) सर अॅलिस्टर कूक:

इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कूकला २०१९ मध्ये नाइट पुरस्कार देण्यात आला. त्याने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील शेवटच्या आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात भारताविरुद्ध विस्मरणीय शतक झळकावले. कूकने वयाच्या २१व्या वर्षी भारताविरुद्ध २००६ मध्ये कसोटी पदार्पण केले. कुकने १६१ कसोटी सामन्यांमध्ये ४५च्या सरासरीने १२४७२ धावा केल्या ज्यात ३३ शतके आणि ५७ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सर्वोच्च धावसंख्या २९४ आहे.

Next Story