Viral Photo: स्मृती मानधनाने परदेशी महिला क्रिकेटपटूंसोबत होळी खेळली......पाहा फोटो !

स्मृती मानधनाने परदेशी महिला क्रिकेटपटूंसोबत होळी खेळली......पाहा फोटो !
बॉलीवूडपासून ते क्रिकेट जगतापर्यंतचे सर्व स्टार होळीच्या उत्साहात भिजलेले दिसले. भारतीय पुरुष क्रिकेट संघाची होळी खेळतानाची छायाचित्रे समोर आली, तेव्हा स्मृती मानधना यांच्या नेतृत्वाखालील आरसीबी संघालाही होळीचा मोह अनावर झाला आणि त्यांचे धूलिवंदन खेळतानाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या संपूर्ण संघाने होळी खेळली होती. यावेळी परदेशी खेळाडूही रंगीबेरंगी गुलालाची उधळण करताना दिसले. ऑस्ट्रेलियन अष्टपैलू एलिस पेरीनेही होळी खेळली आणि त्याचे फोटोही शेअर केले.
स्मृती मानधना निळ्या रंगात तर पेरीचा स्टायलिश लूक गडद पिवळ्या रंगात दिसला. आरसीबीने दोन गट फोटो देखील शेअर केले आहेत, ज्यात खेळाडू तसेच सपोर्ट स्टाफचे काही सदस्य आहेत.
एलिस पॅरीच्या केसांचा रंग दोनदा धुवून ही गेला नाही. केस गुलाबी दिसत आहेत. तिने कॅप्शन दिले की, "हे कायमचे टिकणार आहे का याबद्दल आश्चर्य वाटते?" मी माझे केस दोनदा धुतले आहेत."
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ होळी खेळण्यापूर्वीच दोन सामने हरला होता. आता गुजरात टायटन्ससोबतच्या तिसऱ्या सामन्यातही त्यांचा ११ धावांनी पराभव झाला.