Janmarathi

वेस्ट इंडिजचा हा दिग्गज फलंदाज जो विरुद्ध टीमला सांगून विक्रम मोडीत असे.......!

वेस्ट इंडिजचा हा माहान फलंदाज जो विरुद्ध टीमला सांगून विक्रम मोडीत असे.......!
X

वेस्ट इंडिजचा हा माहान फलंदाज जो विरुद्ध टीमला सांगून विक्रम मोडीत असे.......!

वेस्ट इंडिजचा दिग्गज क्रिकेटर ब्रायन लाराने वेस्ट इंडिजकडून खेळताना अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. क्रिकेटमध्ये जेव्हा-जेव्हा महान खेळाडूंचे नाव घेतले जाते, तेव्हा ब्रायन लाराचे नाव या महान खेळाडूच्या यादीत नक्कीच असते. त्यांच्या सुरुवातीच्या आयुष्याविषयी सांगायचे झाले तर, त्यांचा जन्म २ मे १९६९ रोजी सांताक्रूझ, त्रिनादाद, वेस्ट इंडिज येथे झाला.

वयाच्या १४ व्या वर्षी, तो फातिमा कॉलेजमध्ये गेला जिथे त्याने हॅरी रामदास यांच्या कडून क्रिकेटचे प्रशिक्षण घेतले. त्याने अनेक वेळा कसोटी फलंदाज क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आणि अनेक क्रिकेट विक्रम आपल्या नावावर केले आहेत. ज्यामध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम, १९९४ मध्ये एजबॅस्टन येथे डरहम विरुद्ध वॉर्विकशायरसाठी नाबाद ५०१ धावा केल्या होत्या.

२००४ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत अँटिग्वा येथे नाबाद ४०० धावा केल्यानंतर कसोटी डावातील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रमही लाराच्या नावावर आहे. लाराने त्याच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत चांगली कामगिरी केली आणि त्यानंतर त्याला संघात नियमित स्थान मिळू लागले आणि त्याने त्याचा जबरदस्त फायदा घेतला.

जानेवारी १९९३ मध्ये, ५ वा कसोटी सामना खेळताना, त्याने सिडनीच्या मैदानावर पहिले शतक झळकावले जेथे त्याने २७७ धावा केल्या. त्याच्या खेळीमुळे वेस्ट इंडिजला तो सामना जिंकता आला, त्यानंतर वेस्ट इंडिजने सलग २ सामने जिंकून ती मालिका जिंकली.

२७ नोव्हेंबर २००९ रोजी ब्रायन लारा यांची ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलियाचे मानद सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. सप्टेंबर २०१२ मध्ये त्याला २०१२-१३ हंगामातील सदस्य म्हणून आयसीसीच्या हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट करण्यात आले. ब्रायन लारा यांना "द प्रिन्स ऑफ पोर्ट ऑफ स्पेन" किंवा फक्त "द प्रिन्स" असे टोपणनाव दिले आहे.

त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर, त्याच्या पत्नीचे नाव लीसेल रोवेदास आहे. ती एक मॉडेल आणि पत्रकार आहे. दोघांनी ही एकमेकांना खूप दिवस डेट केल्या नंतर लग्न केलं आणि आता या दोघांना दोन मुले आहेत. मात्र, लिझेलशी लग्न करण्यापूर्वी त्याने ब्रिटनच्या लिन्से वॉर्डलाही डेट केले होते.

१९ एप्रिल २००७ रोजी त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, सध्या तो समालोचक आणि क्रिकेट तज्ञ म्हणून त्याच्या चाहत्यांसमोर स्वत:ला सादर करत आहे.

Next Story