Janmarathi

Video: क्रिकेटपटू शार्दुल ठाकूरने आपल्या हळदीच्या कार्यक्रमात झिंगाट गाण्यावर धरला ठेका.... व्हिडिओ व्हायरल !

Video: क्रिकेटपटू शार्दुल ठाकूरने आपल्या हळदीच्या कार्यक्रमात झिंगाट गाण्यावर धरला ठेका.... व्हिडिओ व्हायरल !
X

Video: क्रिकेटपटू शार्दुल ठाकूरने आपल्या हळदीच्या कार्यक्रमात झिंगाट गाण्यावर धरला ठेका.... व्हिडिओ व्हायरल !

शार्दुल ठाकूर २७ फेब्रुवारीला मिताली परुलकरसोबत लग्नगाठ बांधणार आहे. केएल राहुल आणि अक्षर पटेल यांच्यानंतर शार्दुल ठाकूर लग्नाच्या पंक्तीत बसणार आहे. ठाकूर २७ फेब्रुवारीला त्याची मंगेतर मिताली परुलकरसोबत लग्न करणार आहे. सध्या सोशल मीडिया वर क्रिकेटरच्या हळदी समारंभाचे फोटो व्हायरल झाले आहेत. शार्दुलचे मुंबईतील जवळचे मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत लग्न होणार आहे. शार्दुलने त्याची दीर्घकालिन मैत्रीण मिताली हिच्याशी नोव्हेंबर २०२१ मध्ये एंगेजमेंट केले. केएल राहुलने अलीकडेच जानेवारी २०२३ मध्ये बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीसोबत लग्न केले. राहुलच्या लग्नानंतर लगेचच अष्टपैलू अक्षर पटेलने मेहा पटेलशी लग्न केले. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात पिवळ्या कुर्त्यात सजलेला शार्दुल ठाकूर त्याच्या हळदी समारंभात झिंगाट या मराठी गाण्याच्या सुरांवर नाचताना दिसत आहे.

शार्दुल ऑस्ट्रेलिया वनडेसाठी सज्ज झाला आहे. त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलताना,या वेगवान गोलंदाजाने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना २४ जानेवारी २०२३ रोजी न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेदरम्यान खेळला होता. सध्या सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर करंडक स्पर्धेसाठी त्याचा कसोटी संघात समावेश करण्यात आलेला नाही, परंतु ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी तो खेळताना दिसणार आहे.

भारत सध्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-० ने आघाडीवर आहे आणि पुढील सामना जिंकण्यासाठी तसेच जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतिम फेरीचे स्थान निश्चित करण्यासाठी भारतीय टीमचे लक्ष असेल. भारताने पहिली आणि दुसरी कसोटी तीन दिवसांत संपवून कांगारू वर वर्चस्व मिळवून विजय मिळवला.

नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने पहिला सामना एक डाव आणि १३२ धावांनी जिंकला, तर दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवरील दुसरा सामना सहा गडी राखून जिंकला. तिसरा सामना, जो मुळात धर्मशाला येथे खेळायचा होता, तो हलविण्यात आला आणि आता इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल.

अंतिम सामन्यासाठी, दोन्ही संघ अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर जातील. कसोटी मालिका संपल्यानंतर भारत तीन एकदिवसीय सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाचे यजमानपद भूषवणार आहे. या दौर्‍याचा २२ मार्च रोजी समारोप होईल आणि त्यानंतर खेळाडू ३१ मार्चपासून सुरू होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगसाठी सज्ज होतील, ज्यामध्ये गतविजेता गुजरात टायटन्स आणि चार वेळा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात पहिला सामना खेळला जाणार आहे.

Next Story