Janmarathi

Video: सूर्यकुमार यादवने गल्लीतील मुलांसोबत क्रिकेट खेळताना मारला ‘सुपला शॉट’, व्हिडीओ होत आहे व्हायरल.......!

Video: सूर्यकुमार यादवने गल्लीतील मुलांसोबत क्रिकेट खेळताना मारला ‘सुपला शॉट’, व्हिडीओ होत आहे व्हायरल.......!
X

Video: सूर्यकुमार यादवने गल्लीतील मुलांसोबत क्रिकेट खेळताना मारला ‘सुपला शॉट’, व्हिडीओ होत आहे व्हायरल.......!

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारतीय संघ घरच्या मैदानावर चार सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेत सूर्यकुमार यादवची कामगीरी खूपच निराश जनक ठरली. पहिल्या दोन सामन्यांसाठी सूर्यकुमार यादवचा संघात समावेश करण्यात आला होता. मात्र, सूर्याचे कसोटी क्रिकेटमधील पदार्पण निराशाजनक ठरले. तो चांगला खेळ करण्यात अपयशी ठरला. मात्र, भारताने २ सामने जिंकून २-१ अशी आघाडी घेतली आहे. सूर्यकुमार यादवला तिसऱ्या कसोटी सामन्या नंतर संघातून वगळण्यात आले असून तो सध्या सुटीचा आनंद घेत आहे.

या दरम्यान, मुंबई इंडियन्सने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये सूर्यकुमार यादव गल्लीतील मुलानं सोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद घेत आहे. यासोबतच सूर्याच्या सूपला शॉटवर चाहत्यांनी लय भारी, एक नंबर भावा, मस्तच शॉट अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. आयपीएल आगामी हंगामाकडे वाटचाल करत आहे. या स्पर्धेचा धुमधडाका ३१ मार्चपासून सुरू होणार आहे. आयपीएलचा पहिला सामना गतविजेता गुजरात जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रंगणार आहे.

Next Story