Janmarathi

Virat Kohli: विराट कोहलीने ४० महिन्यांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये झळकावले शतक, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याचे हे कितवे शतक आहे ते जाणून घ्या.......!

Virat Kohli: विराट कोहलीने ४० महिन्यांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये झळकावले शतक, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याचे हे कितवे शतक आहे ते जाणून घ्या.......!
X

Virat Kohli: विराट कोहलीने ४० महिन्यांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये झळकावले शतक, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याचे हे कितवे शतक आहे ते जाणून घ्या.......!

सध्या ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात बॉर्डर गावस्कर मालिका खेळली जात असून, या मालिकेतील चौथा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर खेळवला जात आहे. आज या सामन्याचा चौथा दिवस असून या सामन्यात फलंदाजांना मोठी मदत मिळत असून ही खेळपट्टी त्यांच्यासाठी अतिशय अनुकूल असल्याने गोलंदाजांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.

दरम्यान, भारताचा महान खेळाडू विराट कोहलीने दीर्घ काळानंतर कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावले असून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यात त्याने आपले शतक पूर्ण केले. विराट कोहली ने २२ नोव्हेंबर २०१९ रोजी शेवटचे कसोटी शतक झळकावले होते. आज ३ वर्षांहून अधिक प्रतीक्षेनंतर हे शतक झळकावले आहे.

त्याचे चाहते, कुटुंब आणि संघ या शतकाची आतुरतेने वाट पाहत होते कारण दीर्घकाळापासून कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या बॅटमधून एकही मोठी खेळी झाली नाही. यासोबतच त्याला या शतकातून खूप आत्मविश्वास मिळेल, तो आपले शतक साजरे करत असताना त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाची लाट आहे.

विराट ने २४१ चेंडूत हे शतक पूर्ण केले. कोहलीचे टेस्ट क्रिकेट मधील २८ वे शतक आहे. या डावात त्याने आतापर्यंत फक्त ५ चौकार मारले आहेत आणि स्ट्राईक अतिशय चांगल्या प्रकारे रोटेट करत आहे. विराट कोहली चे या शतकासह वनडे आणि टेस्ट क्रिकेट मधील शतक मिळून ७५ शतक त्याच्या नावावर आहेत.

Next Story