Janmarathi

आयफोनमध्ये सापडलाय एक नवीन दोष.

कार्ल स्चौ नामक व्यक्तीने आयफोनचा हा दोष समोर आणला आहे. या दोषामुळे आयफोनमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी कायमची बंद होऊ शकते.

आयफोनमध्ये सापडलाय एक नवीन दोष.
X

आयफोनमध्ये सापडलाय एक नवीन दोष.


आयफोनमध्ये एका नवीन दोष बिघाड समोर आला आहे. हा दोष कार्ल स्चौ नामक व्यक्तीने जगा समोर आणला आहे. अतुलनीय सुरक्षा सेवेसाठी मानले जाणारे आयफोन्स, नेहमीच वापरकर्त्यांना शंभर टक्के सुरक्षित उपकरणे देणारी विश्वसनीय कंपनी आहे. सुरक्षेच्या दृष्टीने जगभरात आयफोनला नावाजले जाते. असे असताना आता आयफोनमध्ये असा बग सापाडला आहे की, ज्यामुळे वापरकर्त्यांची वायफाय इंटरनेट केनक्टिव्हिटी बंद पडू शकते.

जर तुम्ही एखाद्या विशेष चिन्हांव्दारे जोडलेल्या "%p%s%s%s%s%n" नामक वायफायला जोडला गेलात तर तुमच्या आयफोनची वायफायने उपलब्ध होणारी इंटरनेटची सुविधा कायमीची बंद पडू शकते. कितीही प्रयत्न केल्यास किंवा फोन बंद करून पुन्हा चालू केला तरी देखील त्याचा काहीही एक फायदा होणार नाही.

तसेच अजून एका सुरक्षा संशोधकानी "%secretclub%power" या नामक वायफायमधील दोष समोर आले आहे. तरी देखील तुम्ही अशा नमाक वायफायला जोडीनी करू नये असे निवेदन आहे, कारण हे तुमच्या आयफोनमधील वायफाय प्रणाली पुर्णपणे बंद करते.

असे असल्यास अजून कित्येक ठिकाणच्या वायफायमध्ये तुम्हाला असा अनामिक दोष आढळून येऊ शकतो. पण सध्य स्थितीनूसार "%s, %n, %p " या चिन्हांनी सुरु होणार्‍या संपणार्या चिंन्हावर लक्ष ठेवण्याची गरज आहे. अशा प्रकारची चिन्हे दिसल्यास त्या वायफायला जोडणी न करता सुरक्षित वायफाचा वापर करावा.

असे न वागल्यास अचूक वायफायला आयफोन जोडल्यास तुमच्या आयफोनला इंटरनेट सुविधा निकामी पडू शकते. तुमचे लॅपटाॅप, आयफोन असोत किंवा आयपॅड यांच्यावर त्याचा परिणाम होऊन त्यांची वायफाय कनेक्टिव्हिूटी कायमी जाऊ शकते. शक्यतो " % "हा चिन्ह असलेल्या वायफायचा वापर न करणे हे त्यातल्या त्यात एक उत्तम उपाय असेल.

Next Story