Janmarathi

Apple Mumbai Store: देशातील पहिले Apple Store उघडले....!

Apple Mumbai Store: देशातील पहिले Apple Store उघडले....!
X

Apple Mumbai Store: देशातील पहिले Apple Store उघडले....!

Apple Store Launch: Apple चे देशातील पहिले स्टोअर आज मुंबईत सुरू झाले. अॅपलचे पहिले अधिकृत स्टोअर मुंबईतील जिओ वर्ल्ड ड्राइव्ह मॉलमध्ये सुरू झाले आहे. Apple चे सीईओ टिम कुक काल यासाठी भारतात पोहोचले आणि आज त्यांनी भारतात Apple च्या फ्लॅगशिप स्टोअरचे भव्य उद्घाटन केले. यावेळी टीम कुक यांच्या हस्ते मुंबई बीकेसी अॅपल स्टोअरचे गेट उघडून उद्घाटन करण्यात आले व यावेळी अॅपलचे शेकडो चाहते व अधिकारी उपस्थित होते.

मुंबईतील पहिल्या अॅपल स्टोअरच्या उद्घाटनाच्या वेळी शेकडो चाहते उपस्थित होते आणि हे स्टोअर २०,००० स्क्वेअर फूटमध्ये पसरले आहे. आज ११ वाजल्यापासूनच लोक येथून खरेदी करण्यासाठी थांबले होते. मुंबईत सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या या स्टोअरमध्ये १०० सदस्यांची टीम काम करत असल्याची बातमी आहे. हे ऍपल स्टोअर एक्झिक्युटिव्ह २० भाषांमध्ये ग्राहक सेवा देण्यास सक्षम आहेत.

अॅपलचे सीईओ टिम कुक काल म्हणजेच सोमवारी भारतात पोहोचले आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी अँटिलिया येथे भेट घेतली. याशिवाय अॅपल स्टोअरच्या अधिकृत लॉन्चिंगपूर्वी काल एका खासगी कार्यक्रमात त्यांनी देशातील प्रसिद्ध व्यक्तींची भेट घेतली. यामध्ये त्यांनी माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे, माधुरी दीक्षित आणि अरमान मलिक, रवीना टंडन, नेहा धुपिया यांसारख्या देशातील मनोरंजन उद्योगातील सेलिब्रिटींची भेट घेतली.

एप्रिलमध्ये दुसरे स्टोअर २० एप्रिल रोजी दिल्लीत उघडेल............

अॅपलचे मुंबईत उघडलेले पहिले स्टोअर अॅपल बीकेसी म्हणून ओळखले जात आहे. कंपनी या स्टोअरसाठी दर महिन्याला ४२ लाख रुपये भाडे देईल आणि कमाईचा काही भाग स्टोअरच्या मालकालाही देईल. यानंतर २० एप्रिल रोजी दुसरे स्टोअर सिलेक्ट सिटी वॉक मॉल, साकेत, दिल्ली येथे सुरू होणार आहे.

Next Story