Israel Weapons: या पाच शस्त्रांमुळे इस्रायल कधीच घाबरत नाही शत्रूला......!

Israel Weapons: या पाच शस्त्रांमुळे इस्रायल कधीच घाबरत नाही शत्रूला......!
जगातील सर्वाधिक छोट्या देशांत गणला जाणारा इस्रायल शांत आणि समृद्ध आहे. हा देश जगात आपल्या लष्करी ताकदीसाठी ओळखला जातो. चारही बाजूंनी शत्रूंनी घेरले असूनही इस्रायलला त्याचा काही ही फरक पडत नाही. जगातील सर्वात शक्तिशाली समजल्या जाणाऱ्या देशांशीही इस्रायल डोळ्यात-डोळे घालून बोलतो. आता आम्ही तुम्हाला काही खास गोष्टी सांगत आहोत, ज्यावरून तुम्हाला कल्पना येईल की हा देश कशाच्या आधारावर निर्भयपणे जगतो.
१.आयरन डोम: इस्रायलवर रॉकेट हल्ल्यांचा काहीही परिणाम होत नाही. वास्तविक या देशाने एक खास तंत्र शोधून काढले आहे. त्यामुळे या देशावर रॉकेट किंवा क्षेपणास्त्र हल्ले कुचकामी ठरतात. देशातील लोकांचे रॉकेट हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी इस्रायलने आयर्न डोम नावाची हवाई संरक्षण यंत्रणा बसवली आहे. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, ते इस्रायलच्या दक्षिणेकडील भागात लावण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे आयर्न डोम सुमारे ७० किमी अंतरावरून रॉकेट शोधून नष्ट करू शकतो. आयर्न डोम ने नोव्हेंबर २०१२ मध्ये ८ दिवसात ४२१ रॉकेट पाडले होते. वृत्तानुसार, शत्रू देश इस्रायलवर रॉकेटने लक्ष्य करताच, त्याआधीच रडार स्टेशन ते रॉकेट पकडून नष्ट करते.
२. F16I सुफा: जगातील अनेक देशांकडे आधुनिक लढाऊ विमाने असली, तरी इस्त्रायलकडे जे जेट आहेत , त्याची बरोबरी कोणता ही देश करू शकत नाही. इस्रायलकडे F16I आहे. विशेषतः इस्रायलने त्याची रचना केली आहे. तसेच जगातील इतर कोणत्याही देशात हे तंत्रज्ञान नाही. विशेष बाब म्हणजे या फायटर जेटमध्ये अनेक खास शस्त्रे आणि एक खास रडार आहे. याशिवाय इस्रायलकडे अशी हेल्मेट्स आहेत, ज्याद्वारे तो शत्रूंना पाहून त्यांना लक्ष्य करू शकतो. त्या हेल्मेट्स चे नाव सुफा आहे.
३.विशेष ड्रोन: इस्रायलचे सर्वोत्तम मानवरहित विमान (ड्रोन) मानले जाते. या आधुनिक ड्रोनच्या मदतीने इस्रायली सैन्य शत्रूचा केव्हाही पराभव करू शकते. ड्रोनच्या माध्यमातून दूरवर बसलेल्या शत्रूंना सहज लक्ष्य करता येते. अनेक सेन्सर्स आणि शस्त्रांनी सज्ज असलेले हे ड्रोन न थांबता ३० तासांपेक्षा जास्त काळ हवेत राहू शकतात.
४.मर्कवा एमके४ टैंक: हा रणगाडा इस्रायली सैन्याच्या सर्वात मजबूत स्तंभांपैकी एक आहे. यामध्ये लेझर चेतावणी प्रणाली आणि स्मोक स्क्रीन ग्रेनेडचा समावेश आहे. Mk.४ टँकमध्ये १२० mm स्मूथबोअर गन बसवण्यात आली आहे, ती हीट आणि सैबोट राऊंड तसेच LAHAT अँटी-टँक मार्गदर्शित क्षेपणास्त्रे मारण्यास सक्षम आहे.
५.डर्बी क्षेपणास्त्र: हे क्षेपणास्त्र इस्रायलसाठी खूप खास आहे. हे क्षेपणास्त्र लढाऊ विमानांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. हे हवेतून हवेत मारा करणाऱ्या सर्वोत्तम क्षेपणास्त्रांपैकी एक आहे.