Janmarathi

"अलेक्सा" बोलायला आवडते, पण यावर एका नव्या वादात अडकणार ऍमेझॉन?

मुलांच्या कुटुंबांकडून अलेक्सा या व्हाॅइस असिस्टंटचे नाव बदलण्यात यावे अशी मागणी केली जात आहे.

अलेक्सा बोलायला आवडते, पण यावर एका नव्या वादात अडकणार  ऍमेझॉन?
X

अलेक्सा बोलायला आवडते, पण यावर एका नव्या वादात अडकणार ऍमेझॉन?

अलेक्सा या व्हॉइस असिस्टंट स्पिकरमुळे ऍमेझॉन पुन्हा एकदा वादाच्या भोवर्‍यात अडकला आहे.

कोणत्याही तांत्रिक अडचणी नसताना चक्क त्या व्हॉइस असिस्टंट स्पिकरच्या नावावरून हा नवा वाद निर्माण झाला आहे. अलेक्सा असे नाव असलेल्या बहुतांश मुलींना त्याच्या शाळांमध्ये इतर विद्यार्थ्यांकडून सारखे नावावरून चिडवले जाते. या कारणाने त्यातील काही मुलींंना सारखेच शाळा बदलाव्या लागत आहेत. आता त्याच्या कुटुंबांकडून अलेक्सा या व्हाॅइस असिस्टंटचे नाव बदलण्यात यावे अशी मागणी केली जात आहे.

बीबीसीच्या अहवालानुसार अलेक्सा असे नाव असलेल्या मुलींच्या पालक सांगतात की, त्याच्या पाल्याला शाळेत सतत गुंडेगीरी केली जाते. कारण त्यांचे नाव ऍमेझॉनच्या व्हाॅइस असिस्टंटशी समयक आहे. त्यांनी ह्या व्हाइस असिस्टंटचे नाव बदलण्यात यावे अशी मागणी केली आहे. शिवाय या व्हॉइस असिस्टंट स्पिकरला असे नाव ठेवण्यात यावे जे एखाद्या व्यक्तीच्या नावाप्रमाणे नसेल. २०१४ मध्ये जेव्हा ऍमेझॉन ह्या व्हाइस असिस्टंट स्पिकर प्रणालीची घोषणा केली तेव्हा या "अलेक्सा" नावाला खुप प्रसिध्दही मिळाली. प्रतिनिधित्व करणार्‍या या सर्व उपकरणांना अलेक्सा असचं व्हाइस असिस्ट करण्याचा संदेश देण्यात आला. ज्यां व्यक्तींची नावे ह्या नावा सारखीच असल्याने खुप मोठा अडथळा आता निर्माण झाला आहे.

बीबीसीने म्हटले, दुसरी व्यक्ती जाण असून देखील दादागीरीने अलेक्सा असे नाव पुकारतात आणि मग त्या उपकरणाच्या फिचरनूसार त्या व्यक्तीवर आदेश देण्याचा पर्यंत्न करतात. एका पाल्य सांगतो, मा‍झ्या मुलीने पुढील शैक्षणिक वर्गात शिक्षण घेण्यास सुरुवात केली. तेव्हापासून हि गुंडेगीरी, छळ सुरू आहे. तिने स्वत:ची ओळख इतरांना सांगण्याचे थांबवले असून ती अजून एक लहान मुलगी आहे. अशा पद्धतीने मोठ्यांनी तिला हिनवणे किंवा चिडवणे अयोग्य आहे. यामुळे माझ्या मुलीचे मानसिक खच्चीकरण झाल्याचे ते पुढे सांगतात.

हेदर (एका मुलाचे पाल्य) सांगतात, आता माझी मुलगी एका चांगल्या शाळेत शिक्षण घेत असून आम्ही तिच्या पुर्वीच्या मित्र, मैत्रिणीबाबतचे बोलणे टाळतो आणि त्याच्याशी असलेले संबंधही तोडले आहे. आता तीने नवी सुरुवात केली आहे. तरी देखील ऍमेझॉन हे नाव त्वरित हटवून एक नवीन नाव त्या जागी देण्यात यावे अशी आमची मागणी आहे. सोबतच हे नाव निश्चित करताना ऍमेझॉन पुरेसा पाठपुरावा केला नसल्याचे, हेदर असेही कळवतात. एका अहवालातून अशी माहिती समोर या आली आहे. युके मधील जवळ जवळ ४००० हून अधिक व्यक्तींचे नावे अलेक्सा अशी आहेत. आणि या व्यक्ती २५च्या खालच्या वयाच्या आहेत.

या नव्या उद्भवलेल्या वादावर ऍमेझॉन म्हणेन आहे की, हे उपकरण व्यक्तींशी संलग्न असायला हवे अशा प्रकारे तयार करण्यात आले आहे. आम्ही खुप दु:ख व्यक्त करतो. तुम्हाला ह्या सर्व अनुभवांना सामोरा जावे लागत आहे. गुंडगिरी करणे हे कोणत्याच प्रकारे मान्य नाही. पण ह्या संबंधित निर्णायक पावले उचलली जातील असे ऍमेझॉन स्पष्ट केले.

Next Story