Janmarathi

पाकिस्तानी-ब्रिटिश नागरिक गोर्या मुलींच जीवन उद्ध्वस्त करत आहेत, ब्रिटनच्या गृहमंत्र्यानी सांगितले भयानक सत्य.......!

पाकिस्तानी-ब्रिटिश नागरिक गोर्या मुलींच जीवन उद्ध्वस्त करत आहेत, ब्रिटनच्या गृहमंत्र्यानी सांगितले भयानक सत्य.......!
X

पाकिस्तानी-ब्रिटिश नागरिक गोर्या मुलींच जीवन उद्ध्वस्त करत आहेत, ब्रिटनच्या गृहमंत्र्यानी सांगितले भयानक सत्य.......!

ब्रिटनचे गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांनी एका दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, "ब्रिटिश पाकिस्तानी ब्रिटनमधील गोर्‍या मुलींवर बलात्कार करतात, त्यांना ड्रग्ज देतात. ब्रिटनच्या गृहमंत्र्यांनी ब्रिटीश पाकिस्तानी पुरुषांबद्दल अतिशय कडक शब्दात टिपणी केली आहे आणि म्हटले आहे, की ब्रिटिश पाकिस्तानी एक टोळी तयार करून काम करतात, त्यांच्यासाठी गोर्‍या मुलींची शिकार करणे खूप सोपे आहे. ब्रिटिश पाकिस्तानी गोर्‍या मुलींच्या परिस्थितीचा फायदा घेत, त्यांना अंमली पदार्थ खाऊ घालून त्यांच्यावर बलात्कार करतात. यासोबतच ते म्हणाले की, "राज्यातील पोलिस यंत्रणा आणि सामाजिक कार्यकर्ते अशा प्रकरणांकडे डोळेझाक करत असल्याचे आपण पाहिले आहे". ब्रिटनच्या गृहमंत्र्यांनी केलेल्या आरोपांना भारतीय गुप्तचर संस्था रिसर्च अँड अॅनालिसिस विंग म्हणजेच RAW चे माजी प्रमुख विक्रम सूद यांनी पुष्टी दिली आहे.

पाकिस्तानी वंशाच्या नागरिकांनी ब्रिटनमध्ये एक धोकादायक वसा निर्माण केला असून ते टोळ्या तयार करून गोर्‍या मुलींची शिकार करतात, या ट्विट ला माजी भारतीय रॉ प्रमुख विक्रम सूदही साथ देत आहेत. एकापाठोपाठ एक अनेक ट्विट करून त्यांनी ब्रिटिश पाकिस्तानींच्या भयंकर कारवाया उघड केल्या आहेत. स्मिता प्रकाश या वृत्तसंस्थेने केलेले ट्विट रिट्विट करत विक्रम सूद यांनी लिहिले, "हे यूकेमध्ये १९९७ पासून घडत आहे, ज्यामध्ये १४०० गैर-मुस्लिम गोर्‍या मुलींवर बलात्कार झाला आणि यातील बहुतांश घटने मध्ये पाकिस्तानी वंशाचे नागरिक सामील होते". त्यांनी लिहिले की, "अशा प्रकरणांमध्ये इस्लामोफोबियाच्या नावाखाली तक्रारी दूर केल्या जातात." सध्या परिस्थिती अशी बनली आहे की "तक्रारदारांना पोलिसांचे संरक्षण घ्यावे लागत आहे. जातीवादाचे आरोप आणि आंतर-समुदायिक संबंध बिघडण्याच्या भीतीमुळे पोलिस कारवाई करण्यात नेहमीच अपयशी ठरतात".

पाकिस्तानी लोकांची मानसिकता वाईट आहे आणि एके काळी ब्रिटनच नाही तर तुर्कस्तानलाही पाकिस्तानींनी त्रास दिला होता. सौदी अरेबियात १०० हून अधिक पाकिस्तानींचा बलात्काराच्या आरोपाखाली शिरच्छेद करण्यात आला आहे, तर तुर्कस्तानमध्ये 'पाकिस्तानींना हाकलून लावण्याची' मोहीम सुरू आहे. गेल्या वर्षी सुमारे ५००० पाकिस्तानी तुर्कीच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये कोठडीत होते, त्यांच्यावर लैंगिक गुन्ह्यांचे आरोप होते. गेल्या काही वर्षात तुर्कस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध पाकिस्तानी दाखल झाले आहेत, त्यामुळे तुर्कस्तानमध्ये चोरी आणि लुटमारीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत, त्यामुळे तुर्कस्तानमध्ये पाकिस्तानींना हाकलून देण्याची मोहीम सुरू आहे. केवळ लैंगिक गुन्ह्यांमध्येच नाही तर बेकायदेशीर पाकिस्तानी स्थलांतरित टोळी, मानवी तस्करी, अंमली पदार्थांची तस्करी आणि तुर्कस्तानला भेट देणाऱ्या पर्यटकांकडून खंडणीसाठी अपहरण यासह इतर गुन्ह्यांमध्ये सामील असल्याचे आढळले आहे. एप्रिल २०२२ मध्ये, तुर्कीमध्ये अशाच एका पाकिस्तानी टोळीचा पर्दाफाश झाला, ज्याने नेपाळमधील काही पर्यटकांचे अपहरण केले आणि त्यांच्या सुटकेच्या बदल्यात पैशाची मागणी केली. या घटनेत तुर्की पोलिसांनी ६ पाकिस्तानी नागरिकांना अटक केली.

पाकिस्तान जगासाठी डोकेदुखी ठरलाय का......?

एप्रिल २०२२ मध्ये यूके सरकारच्या अहवालानुसार, ब्रिटनमध्ये अटक करण्यात आलेल्या प्रत्येक एक हजार लोकांमध्ये आशियाई वंशाच्या ११ नागरिकांचा समावेश आहे. त्याचबरोबर बांगलादेशचे १४, चीनचे ३, भारताचे ६ आणि पाकिस्तानचे १४ नागरिक सामील आहेत. ब्रिटनच्या तुरुंगात बंद असलेल्या एकूण गुन्हेगारांमध्ये पाकिस्तानी सातव्या क्रमांकावर आहेत. इतकंच नाही तर गेल्या वर्षी एप्रिल आणि मे महिन्यात ग्रीसमध्ये एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीची धोकादायक पद्धतीने हत्या केल्यामुळे पाकिस्तानींना देशाबाहेर हाकलण्याची मोहीम सुरू झाली होती. पाकिस्तानातून आल्यानंतर ग्रीसमध्ये स्थायिक झालेल्या पाकिस्तानातील रहिवासी अहसान खानने ही हत्या केली होती. मुलीने कुराणातील एका श्लोकाचा चुकीचा उच्चार केल्यामुळे अहसानने मुलीची निर्घृण हत्या केली होती. अहसान त्या मुलीला धर्मांतरासाठी ख्रिश्चनमधून मुस्लिम बनवत होता आणि ती मुलगी श्लोक लक्षात ठेवत होती, त्यावेळी तिने चुकीचा उच्चार केला.

Next Story