Janmarathi

क्वाड देशांची होणार 12 मार्च रोजी बैठक भारताचे पंतप्रधान होणार सामील.

भारतासह अमेरिका, जापान व आस्ट्रेलिया या चार देशांच्या या संघटनेच्या पहिल्या बैठकीत स्थानिक व जागतिक मुद्द्यांवर होणार चर्चा.

क्वाड देशांची होणार 12 मार्च रोजी बैठक भारताचे पंतप्रधान होणार सामील.
X

१२ मार्च २०२१ रोजी क्यू.यु.ए.डी. या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या सदस्य राष्ट्रांची पहिली बैठक होणार आहे. या संघटनेच्या सदस्य राष्ट्रांचे प्रमुख यावेळी उपस्थित असतील त्यामध्ये मार्चचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी , अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन हे यावेळी उपस्थित राहतील. या बाबतची महिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. हि बैठक ओंलीने स्वरूपात होईल असेही त्यांनी सांगितले.

या चार राष्ट्रांची हि पहिलीच बैठक असून या राष्ट्रांच्या प्रमुखांकडून यावेळी त्यांच्या स्थानिक तसेच जागतिक समस्यांबाबत चर्चा यावेळी होईल. हिंदी- प्रशांत महासागरातील स्वतंत्र, अखंडित व इतर जहाजांच्या वाहतुकीवर यावेळी चर्चा करण्यात येईल. तसेच या महासागरीय प्रदेशातील कोरोना परिस्थिती सर्वाना एकसमान परवडणारी लस याबाबतही चर्चा होईल. अमेरिका व ऑस्ट्रेलिया या देशांनी कोरोना रोगाच्या संसर्गासाठी चीनला जबाबदार धरून चौकशीची मागणी केली होती या विषयावरही चर्चा बैठकीत होईल का यावर सर्वांचे लक्ष असणार आहे.

भारतासह इतर सदस्यराष्ट्रांचे, हिंदी- प्रशांत महासागरातील वाहतुकीच्या क्षेत्रात शांतता राहावी कोणत्याही प्रकारची युद्धजन्य परिस्थिती निमार्ण होणार नाही याबाबत खबरदारी घेणे हे या संघटनेचे उद्दिष्ट असणार आहे.

Next Story